पुणे ,दि.३१ (punetoday9news):-  पुण्यातील हडपसर येथे १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीचे चौघांनी अपहरण करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य दोन आरोपी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “हडपसर येथील ससाणेनगर भागात राहणारी १५ वर्षीय तरुणी बाहेर जाऊन येते सांगत २६ ऑक्टोबर रोजी घराबाहेर पडली होती. मात्र बराच वेळ होऊनदेखील मुलगी घरी न आल्याने तिच्या आई-वडिलांनी आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. २९ तारखेला तरुणी दुपारच्या सुमारास सासवड येथे सापडली. तरुणीने आपल्यावर चौघांनी बलात्कार केल्याचं सांगितले ”.




तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. दोन आरोपींना पकडण्यात आले असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.

Comments are closed

error: Content is protected !!