पुणे, दि.३१ (punetoday9news) :- पुणे पदवीधर मतदार संघात रहिवास असून सुद्धा मतदार म्हणून नावनोंदणी न केलेल्या सर्व शाखांच्या पदवीधरांना सध्या आयोगाकडून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी चालू आहे.
तसेच आजपर्यंत ज्यांनी स्वतःची व इतरांची नोंदणी केली आहे,परंतु पदवीधर मतदार यादीत त्यांचे नाव आले नाही,त्यांनी ऑनलाइन पध्दतीने पुन्हा खालील आयोगाच्या https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx या लिंकवर काळजीपूर्वक फॉर्म भरावा.
कोणत्याही शाखेची डिग्री/डिप्लोमा व इतर कोणत्याही कोर्सची शेवटच्या किंवा त्यापुढील कोणत्याही पदवीचे मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट व रहिवाशी पुरावा (आधारकार्ड,मतदानकार्ड,रेशनकार्ड,बँक पासबुक,पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स) या पैकी कोणताही एक रहिवाशी पुरावा म्हणून अपलोड करावा.
ऑनलाइन नोंदणी करताना ओरिजनल कागदपत्रे अपलोड न करता झेरॉक्स काढून त्यावर गॅझेटियर ऑफिसरचा सही, शिक्का व स्व-साक्षांकित (सेल्फ अटेसस्टेड) करूनच अपलोड करावीत.
योग्य पद्धतीने फॉर्म भरला कि तुम्ही पदवीधर मतदार होऊन योग्य उमेदवारास मतदान करू शकता.
Comments are closed