सांगवी, दि. २( punetoday9news):- कोरोना कालावधीत विविध क्षेत्रात जोखमीचे काम करणाऱ्या नऊ जिल्ह्यातील नऊ रणरागीणींचा अखिल भारतीय विश्वकर्मा सुतार समाज तसेच विश्वकर्मा प्रतिष्ठिन, कुंभारगाव, सातारा यांच्या वतीने विश्वकर्मा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

नवरात्रोस्तव हा आदिशक्तीचा जागर करण्यासाठी केला जातो. नवदुर्गांचा महीमा अगाध आहे. त्यासाठी दरवर्षी नवरात्री उत्सव आपण साजरा करत असतो. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील आपापल्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगीरी करणाऱ्या नऊ रणरागीणींच्या कार्याला वेगळ्या नजरेने बघत, त्यांच्या कर्तुत्वाचा जागर करण्यासाठी प्रतिष्ठिनच्या वतीने पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला.




विविध जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीच्या काळातही समाजासाठी अविरत काम करणाऱ्या व जिल्ह्यातील तालुक्यातील विविध क्षेत्रात प्रशंसनीय अशी कामगीरी करुन आपल्या नावाची छाप पाडणाऱ्या सन्माननीय रणरागीणींचा सन्मान आयोजित करण्यात आला.

समाजाच्या सामाजिक , आर्थिक व आध्यात्मिक उन्नतीसाठी सदैव प्रयत्न करणारे अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ संलग्न विश्वकर्मा प्रतिष्ठान , कुंभारगाव , सातारा यांच्या वतीने दि . १ नोव्हेंबर २०२० विश्वकर्मा नवदुर्गा पुरस्कार डॉ. जयश्री देविदास शेलार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे निलख येथील वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आला त्यांची समाज सेवेची आवड व वैद्यकिय सेवेमध्ये असल्यामुळे शासनाच्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभागी होवून टी.बी. , कुष्टरोग , पोलिओ तसेच स्मीभृण हत्यावर यावर स्वत : ची अडिओ – व्हिडीओ क्लिप बनवून समाजप्रबोधनाचे काम केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय सुधारणा आणि गतिमानता अभियानांतर्गत १० कलमी उपक्रमामध्ये अंतर्गत स्पर्धांमध्ये पिं.चि. महानगर पालिकेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला . आजही कोरोनाच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न बारा बारा तास गेली आठ महिने आरोग्य सेवेचे अखंड कार्य करीत आहेत . एक तेजस्वी सुर्याप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना संपुर्ण महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील जनमाणसामध्ये डॉ जयश्री शेलार यांनी आपली एक आदर्श समाजभुषण म्हणुन ओळख निर्माण केली आहे . त्यांच्यासारखे मानवतेची पुजा करणारी समाजप्रेमी मंडळी बोटावर मोजण्याइतकी आहेत . त्यांनी केलेल्या या अनमोल अशा कार्याचा सार्थ अभिमान, म्हणुनच त्यांना अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ जि . सातारा संलग्न विश्वकर्मा प्रतिष्ठान , कुंभारगांव , जि . सातारा यांचे वतीने ” विश्वकर्मा नवदुर्गा पुरस्कार कृतज्ञतापुर्वक समर्पित करण्यात आला आहे .

हा पुरस्कार ज्ञानेश्वर भालेराव संस्थापक अ.म.वि.सु.समाज महासंघ, हनुमंत पांचाळ प्रदेशाध्यक्ष अ.म.वि.म.समाज महासंघ, विनायक वसंत सुतार जिल्हाध्यक्ष अ.म.वि.सु.समाज महासंघ , विश्वकर्मा प्रतिष्ठान , कुंभारगाव , सातारा यांच्या वतीने देण्यात आला.

Comments are closed

error: Content is protected !!