पिंपरी,दि.३( punetoday9news):-  भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप व भाजपा ओबीसी प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते ललित म्हसेकर भाजपा ओबीसी मोर्चा “प्रसिद्धी प्रमुख ” पिं. चिं शहर पदावर नियुक्ती करण्यात आली.




म्हसेकर हे मुळ ओबीसी सोनार समाजाचे असुन   उच्चशिक्षित बीटेक इंजिनीअर व सेफ्टी ऑफिस पदवीधर आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, ओबीसी मोर्चा पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यापूर्वी भारतीय जनता पक्षाने ललित म्हसेकर यांच्यावर २०१७ ते २०२० पर्यंत भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी चिंचवड विधानसभा अध्यक्ष या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.




पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मी पक्षाचा अधिक विस्तार करुन दिलेली जवाबदारी निष्ठेनी पार पाडेन. पक्षाचे ध्येय, धोरण तसेच केंद्र सरकारचे काम व विचार समाजातील तळागाळातील जनते पर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करेल असे मत म्हसेकर यांनी मांडले.

 

Comments are closed

error: Content is protected !!