सांगवी:- पाश्चात्य देशातील “विविध डे” सर्रासपणे भारतात साजरे केले जातात. त्यापैकी मुले आणि वडिलांचे नाते दृढ करण्ययासाठी व वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘फादर्स डे’ दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो .
याच संकल्पनेतून पोलिस विभागात कार्यरत राहून कुटुंब व सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी चोविस तास तत्परतेने कार्य करणाऱ्या वडिलांचा बसवेश्वर बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला .
यावेळी सांगवी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे व गुन्हे अन्वेषण विभागचे अजय भोसले यांचा बलभीम भोसले अध्यक्ष बसवेश्वर बहुउद्देशिय संस्था व दत्तात्रय भोसले अध्यक्ष चंद्रभागा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सांगवी पोलिस स्टेशन मधील राम पवार प्रकाश नलगे रोहीदास बोऱ्हाडे, शंकर जाधव, राजेंद्र सावंत, सुदाम अस्वले, सुनील बोकड, गिरीष राऊत यांचा सन्मान रंगनाथ उंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सांगवी, विजयसिंह भोसले, दत्रातय किंडरे यांच्या हस्ते सन्मान पत्र व रोपे देऊन करण्यात आला. यावेळी प्राजक्ता चौगुले, आश्विनी जगताप, राजेंद्र भिसे, सोमनाथ अस्वले, भारत पारधी, प्रथमेश बाईत, रवींद्र रेंगडे दत्रातय भोसले मान्यवर उपस्थित होते.
या दिवसाच्या निमित्ताने वडिलांप्रती नि:स्वार्थ प्रेम आणि सन्मान व्यक्त करता येतो. आई, बहिण, मित्र, पत्नी यांच्यासाठी “डे” साजरा करत असताना कुटुंबाचा आधार स्तंभ मागे राहता नये. वडीलांच्या छत्रछायेत आपण सुख अनुभवतो मात्र त्यासाठी वडिलांना किती तरी कष्ट, हालअपेष्टा सहन करून जीवन जगावे लागते. त्यामुळे फादर्स डे साजरा करावा असे नवतरूणांना वाटते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार बलभीम भोसले यांनी मानले.
Comments are closed