मुंबई, दि.४(punetoday9news):- रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कागदपत्रे , कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे.
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पैसे थकवल्याचा आरोप करत पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
यामुळे अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आले होते . अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.
रिपब्लिकने केलेल्या दाव्यानुसार, ‘कोणतीही अधिकृत कागदपत्र नसताना पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की करून जबरदस्तीने अटक केल्याचा दावा केला आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचा व बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे.’
Comments are closed