रोटरी कडून ४३ पोलिसांना कोरोनायोद्धे पुरस्कार प्रदान.
पिंपरी,दि.४(punetoday9news):- रोटरी क्लब हि राजकीय नव्हे तर सामाजिक “लीडर” घडविणारी संस्था आहे.असे गौरवोद्गार पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढले. रोटरी क्लब ऑफ़ उद्योगनगरी,संस्कार सोशल फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ़ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अप्पर पो. आयुक्त रामनाथ पोकळे,उपायुक्त मंचक इप्पर, उपायुक्त आनंद भोइटे, रोटरी क्लब उद्योगनगरीचे अध्यक्ष रमेश सातव,संस्कार फौंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, पिंपरी क्लबचे अध्यक्ष मेहुल परमार,रोटरी क्लबचे हंगामी संचालक डॉ निलेश लोंढे आदी उपस्थित होते. कोरोना सेलचे उपायुक्त सुधीर हिरेमठ सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील,सहाय्यक पो. निरीक्षक अनिल लोहार यांच्यासह ४० पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयुक्त कृष्ण प्रकाश यांना रोटरी क्लब उद्योगनगरीने सदस्यत्व बहाल केले.आयुक्त यांना सदस्यत्वाची पिन लावून समाज कार्य करण्याची शपथ घेतली.
आयुक्त कृष्ण प्रकाश पुढे म्हणाले कि, पोलीस बांधव व सामान्य नागरिकांनी “सेवा परमो धर्म” या उक्तीप्रमाणे फक्त निस्वार्थपणे समाजसेवा केली पाहिजेत.
सेवा केल्यास मिळणारा समाधान, आनंद, समाधान हे वेगळेच असते.रोटरी क्लबची सेवा हि सकारात्मक आहे. रोटरी एक सेवा आहे व सेवा केल्यामुळे मिळणारा आनंद हा परमानंद प्रमाणे आहे त्यामुळे रोटरी मध्ये काम करताना कोणी थांबत नाही ,कोणी कोणापुढे झुकत नाही तर अविरत सेवा करत राहतात.
प्रास्ताविक रमेश सातव यांनी केले. नितीन ढमाले यांनी रोटरी क्लबच्या कार्याची माहिती दिली. सुत्रसंचालन मेघा गोखले व डॉ समीक्षा जडे यांनी तर आभार मेहुल परमार यांनी मानले.
Comments are closed