तर दुसरीकडे राज्य सरकारने रिक्त पदांची भरती केली नसल्याने हजारो शिक्षक नोकरीच्या प्रतिक्षेत.
मुंबई, दि.५(punetoday9news):- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे .
केंद्रीय माध्यमिक बोर्डाने परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. कोरोना महामारीचं सावट लक्षात घेऊन बोर्डाने परीक्षार्थींना परीक्षा केंद्राचं ठिकाण बदलण्याची मुभा दिली आहे. तर एकुण १३५ केेंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे .
परीक्षार्थींना इच्छित ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याची मुभा. ७ नोव्हेंबरपासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा पर्याय उपलब्ध होणार आहे
परीक्षार्थींना १६ नोव्हेंबर पर्यंत हा पर्याय खुला राहणार असुन या कालावधीत परीक्षार्थीनी हव्या असलेल्या चार परीक्षा केंद्राची निवड करायची आहे .
Comments are closed