पिंपरी, दि. ५ (punetoday9news):- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज ३२ वा वाढदिवस आहे. एकोणिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने आक्रमक फलंदाजीमुळे अनेक विक्रम आपल्या नावावर करत दिग्गजांना मागे टाकलं आहे.विराट कोहली चे चाहते भारतासहित जगभरात पाहायला मिळतात . अशाच एक चाहता वर्गापैकी पिंपरी चिंचवड शहरातील आदिती निकम यांनी आपल्या क्रिकेट पटू विराट कोहली च्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर विधवा अंपग यांना गहू व तांदूळ वाटप केले .
तर अशा विक्रमादित्य विषयी जाणूया .
विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीत झाला होता. एकोणिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली आहे. विराट कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या क्रिकेटच्या या तिन्ही फॉरमॅटमध्ये ४१६सामने खेळून एकूण ७० शतकं करून सचिन तेंडुलकर (१००) आणि रिकी पॉण्टिंगच्या (७१) नंतर ३ नंबरला आहे. विराट कोहलीच्या नावावर आतापर्यंत ७ दुहेरी शतकं, कर्णधार म्हणून जगातील सर्वाधिक दुहेरी शतकं, कर्णधार म्हणून६ शतकं अशा विक्रमाची नोंद आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सलग ४मालिकांमध्ये ४ दुहेरी शतक, वन डे मध्ये सर्वात जलद ८०००, ९०००, १००००, ११००० धावा करण्याचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारताने २००८ मध्ये अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरलं होतं.
विराट कोहलीकडे कर्णधारपद आल्यानंतर २०१८ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियामध्ये २-१अशा फरकाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर तब्बल ७१ वर्षांनी विजय मिळवला होता
Comments are closed