युएस निवडणूक(punetoday9news):- जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या राष्ट्रपतीपदावर कोण बसणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असताना अमेरिकेतील एक विडिओ सोशल मिडिया वर भलताच व्हायरल होत आहे.




मतमोजणी तिसरा दिवस असला तरी अजुनही स्पष्ट निकाल हाती आलेला नाही,  राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन दोघे आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. बायडन हे विजयाच्या जवळ आहेत.

अमेरिकेतील एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रम्प यांच्या विजयासाठी  तंत्र मंत्रांचा आधार घेतला जात असल्याचे दिसत आहे. ट्रम्प पिछाडीवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या धर्मगुरु पाउला व्हाईट यांनी तात्काळ ट्रम्प यांच्या विजयासाठी प्रार्थना सुरु केली आहे.  पाउला यांनी मंचावरुन दक्षिणी अमेरिका तसेच लॅटिन अमेरिकेत ट्रम्प यांच्या विजयासाठी देवदूतांना आवाहन केले आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!