G.Pay,  Paytm, phonepe ला टक्कर.

 

मुंबई,दि.६( punetoday9news):- व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. व्हॉट्सॲपने लाँच केलेल्या यूपीआय पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणे शक्य होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय आधारित सिस्टम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. जून महिन्यामध्ये व्हॉट्सॲपने पेमेंट सर्व्हिस सुरू केली होती. परंतु ही सेवा वापरण्याची संधी केवळ काही व्हॉट्सॲप यूजर्सला मिळाली होती.




आताही NPCI ने काही मोजक्या क्रमांकाना व्हॉट्सॲप मनी ट्रान्सफरची सेवा वापरण्याची परवानगी दिली आहे. परंतु आता कंपनी आगामी काळात ही मर्यादा वाढवणार आहे

व्हॉट्सॲप पेमेंट सुविधेसाठी गो लाईव्हची मंजुरी देण्यात आली आहे. व्हॉट्सॲप या मंजुरीच्या प्रतिक्षेत होता, त्यामुळे आता लवकरच व्हॉट्सॲप पेमेंटचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

 व्हॉट्सअ‍ॅप यूपीआय वर जास्तीत जास्त २० दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्याचा आधार घेऊन आपला यूपीआय यूजर बेस वाढवू शकतो, अशी माहिती NPCI ने दिली आहे.

Comments are closed

error: Content is protected !!