‘मे’ पूर्वी बोर्डाच्या परीक्षा घेण्याचाही प्रयत्न राहील . 

 

मुंबई, दि.६(punetoday9news):-  महाराष्ट्र शासनाने अनलॉक नंतर हळूहळू सर्वच क्षेत्रात ‘पुनश्च हरिओम’ला सुरूवात केली आहे. वाहतुकीची साधने, प्रवास व्यवस्था,नाट्य, सिनेमागृह, बाजारपेठ सुरळीतपणे सुरू केलेल्या आहेत याच पार्श्‍वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

शाळा बंद असल्यातरी शिक्षण ऑनलाईन चालू आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच २३नोव्हेंबर२०२० पासून राज्यातील शाळा चालू करण्याबाबत एसओपी तयार करण्यात आली असून त्याबाबत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आली असल्याचेही सांगितले. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्र्यांच्या अंतीम मंजुरी नंतर शाळा सुरु करण्यात येतील असे मत व्यक्त केले आहे .




कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून  या संदर्भात पालकांची परवानगी घेऊनच आरोग्य विषयक उपाययोजना करूनच शाळेतील कामकाज सुरु करण्यात येईल.

शालान्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे दहावी व बारावीच्या परीक्षा वेळापत्रका संदर्भात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षा मंडळातर्फे परीक्षा जाहीर करण्यात येतील.

विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन शाळा अध्ययन – अध्यापन प्रक्रिया व परीक्षा पार पाडण्यासाठी सरकार सक्षमपणे विचार करेल असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड त्या म्हणाल्या.

Comments are closed

error: Content is protected !!