पुणे, दि.४(punetoday9news):-  भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिक्षक व पदवीधर सार्वत्रिक निवडणूक २०२० जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचा पुणे विभागाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.




त्या अनुषंगाने शनिवारी दि. ७ नोव्हेंबर, २०२० रोजी शासकीय सुट्टी असली तरी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार असल्याचे सौरभ राव विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ यांनी कळविले आहे.

Comments are closed

error: Content is protected !!