इस्त्रो (punetoday9news):- इस्त्रोने अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाईट आज यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आजचे इस्त्रोचे हे प्रक्षेपण या वर्षीचे पहिलेच प्रक्षेपण आहे. दुपारी ३ वा. २ मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.  EOS-01 उपग्रहाच्या सिंथेटिक ॲपर्चर रडाराच्या माध्य़मातून दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही आणि कोणत्याही हंगामात शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे.





भारतासाठी हा उपग्रह अनेक अर्थानी फायदेशीर ठरणार आहे. सीमेवर नजर ठेवण्यासाठी त्याचबरोबर कृषी, वने, भूविज्ञान या क्षेत्रात तसेच किनारी भागातील सुरक्षा मजबुत करण्यासाठीही होणार आहे. हा उपग्रह ढगांच्या अडथळ्यांना भेदून हाय रिझोल्युशनचे फोटो घ्यायला सक्षम आहे. त्यामुळे लष्कराच्या क्षमतेत वाढ होणार आहे. इस्त्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी म्हटले की, कोरोनाच्या काळातही सुरक्षेचे सर्व नियम पाळून आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता इस्त्रोच्या टीमने हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे.

Comments are closed

error: Content is protected !!