दिल्ली, दि.8(punetoday9news):- मोदी सरकारने आता सर्व चारचाकी वाहनांसाठी 1 जानेवारी 2021 पासून ‘फास्टॅग’ अनिवार्य केला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे

1 जानेवारी पासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्टॅग’ अनिवार्य करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे एक फास्टॅग हा एका वाहनापेक्षा जास्त वाहनांना लावता येत नाही.




हा नियम ज्या चार चाकी गाड्यांची विक्री 1 डिसेंबर 2017 च्या अगोदर झालेली आहे, अशा M व N कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू असणार आहे.

फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी फास्टॅग गरजेचा केला होता. तसंच गाडीला नॅशनल परमीट मिळण्यासाठीही ‘फास्टॅग’ लावणे 1 ऑक्टोबर 2019 पासून बंधनकारक करण्यात आले होते.

‘फास्टॅग’ काढण्यासाठी बँकेचं खातं लिंक करताना केवायसी असणं आवश्यक आहे. बँकेत जाताना तुमच्या वाहनाची आरसी तुमच्यासोबत ठेवा. Paytm, Amazon pay, Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुनही तुम्ही FasTag काढू शकता.

मंत्रालयाने सांगितलं की, थर्ड पार्टी इंश्युरन्स घेताना देखील मान्यताप्राप्त ‘फास्टॅग’ बंधनकारक असेल. हे इंश्युरन्स सर्टिफिकेटच्या पाहणीवरून होईल, जिथे ‘फास्टॅग’ चा आयडी डिटेल्स पाहिल्या जाईल. हा निर्णय 1 एप्रिल 2021 पासून लागू होईल.

Comments are closed

error: Content is protected !!