पिंपरी,दि.८ (puneyoday9news) : – कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपरी उपबाजार प्रमुखपदी राजू शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
        राजू शिंदे यांनी यापुर्वी देखिल पिंपरी उपबाजार प्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीपणे स्विकारली होती.



त्यांनी आपल्या या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे कामे मार्गी लावली होती. शेतकरी व व्यापार्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांचे त्यांनी निरासन केले होते. पिंपरी भाजी मंडई येथील अनेक समस्या त्यांनी मार्गी लावल्या. तसेच पिंपरी चिंचवडमधील पहिले फुल मार्केट चालू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. परंतु त्यांची बदली झाली. त्यामुळे अनेक कामे तशीच राहिली होती. शिंदे यांना पुन्हा पिंपरी उपबाजार प्रमुखपदी नियुक्त करावे अशी मागणी येथील व्यापारी आणि शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली होते. अखेर राजू शिंदे यांच्याकडे पुन्हा पिंपरी उपबाजार प्रमुखपद देण्यात आले.

Comments are closed

error: Content is protected !!