दिवे घाटरस्ता खड्डेमय ; अपघाताला  खुले निमंत्रण. 

सासवड,दि.८ (punetoday9news) :-  पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ९६५ वरील दिवेघाटात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.  वळणदार रस्ते त्यात अचानक समोर दिसणाऱ्या खड्यांमुळे वाहनचालक पुरते त्रासले आहेत .

पुणे पंढरपूर मार्ग हा महाराष्ट्रातील रखडलेल्या मार्गांपैकी एक मार्ग म्हणावा लागेल . गेली जवळपास १० वर्षे होऊनही हा रस्ता अजूनही पूर्णत्वास गेला नाही. मार्ग रुंदीकरणास असलेला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होत असल्याने कित्येक ठिकाणी जागा न मिळाल्याने काही ठिकाणी रस्ता अरुंद आहे . तसेच इतर अनेक कामेही बाकी आहेत . वाहतूक सुरळीत असली तरी नियोजनाप्रमाणे मार्ग होत नसल्याने वाहन चालक नाराजी व्यक्त करत आहेत .




दिवे घाटात निर्माण  झालेल्या  झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. खड्डे  चुकवण्याचा प्रयत्नात या ठिकाणी अनेक अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत त्यामुळे घाटरस्त्याची डागडुजी चांगली करणे गरजेचे आहे. कारण सद्यस्थितीत असलेले खड्डे  हे पूर्वी बुजवलेल्या खड्ड्यांच्याच जागेवर बनले आहेत त्यामुळे अगोदर केलेल्या खड्डे बुजवण्याचे ( दुरुस्तीचे) काम कोणत्या प्रतीचे होते असाही प्रश्न वाहन चालक उपस्थित करत आहेत.

मागील काही महिन्यात पुरंदर विधानसभा आमदार संजय जगताप यांनी विरोध असलेल्या शेतकऱ्यांची  बैठक घेऊन चर्चा केली असल्याने उर्वरित अपूर्ण कामही लवकर पूर्ण होण्याच्या आशा जागृत झाल्या आहेत.

Comments are closed

error: Content is protected !!