पिंपरी, दि.९(punetoday9news):- कम्युनिटी डॉक्टर-कम्युनिटी कार्यकर्ता कार्यकारणीच्या मीटिंग मध्ये काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली असून पुढील मुद्द्यांवर कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
१) सर्व सदस्यांनी मिळून आपापल्या भागातील कम्युनिटी क्लीनिक वाढवणे व कम्युनिटी क्लीनिक बद्द्ल सर्व माहिती त्या डॉक्टरांना सांगण्यात यावी.
२) प्रत्येक सदस्यांनी ऍक्टिव्ह मेंबर वाढवणे.
३) कोविड -१९ च्या काळात ज्या ज्या हॉस्पिटल ने कोविड रुग्णांना सुविधा दिली आहे त्यांच्या उत्तेजनार्थ त्यांना CDCV तर्फे एक सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
४) निगडी मधुकर पवळे उड्डाणपूल ते पिंपरी चौक पर्यंत असणारे सर्व रस्त्यावर व्यवसाय करणारे व्यवसायिक यांच्यासाठी काही विशेष प्रोजेक्ट राबविणे.
यावेळी डॉ. गणेश अंबिके (संस्थापक अध्यक्ष कम्युनिटी डॉक्टर कम्युनिटी कार्यकर्ता ), हनुमान वि. खटिंग (कम्युनिटी डॉक्टर कम्युनिटी कार्यकर्ता प्रसिद्धी प्रमुख ), गणेश फड (कम्युनिटी डॉक्टर कम्युनिटी कार्यकर्ता संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य) व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed