मुंबई, दि.९ (punetoday9news):-  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्या निवडीचे मुंबई शेअर बाजाराने जोरदार स्वागत केले आहे. मुंबई शेअर बाजारने सुद्धा जो बायडेन यांच्या विजयाला सलामी दिली आहे.

आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजारच्या निर्देशांकाने थेट 673 अंकांनी उसळी घेतली. 42,500 पेक्षा जास्त अंकांसह निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकाजवळ पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा 180 पेक्षा जास्त अंकांसह 12,450 च्या पुढे गेला. यामुळे बँकिंग, वित्तीय सेवा आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ दिसून आली. इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसीच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली.




अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. याआधीच बायडेन यांनी भारतासोबत 150 अब्ज डॉलरचा व्यापार 500 अब्ज डॉलरपर्यंत नेणार असल्याच्या वक्तव्याचा फायदा शेअर बाजारावर दिसत असल्याची माहिती आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!