मुंबई दि.९(punetoday9news):- जीवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंतसारख्या वाहतूक पोलिसांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे काढले.




पिंपरी चिंचवड येथे मास्क न घातल्याने एका कार चालकाविरुद्ध कारवाई करत  वाहतूक पोलीस आबा सावंत यांना त्या कार चालकाने बॉनेटवर लटकवून फरफटत नेले. तरीही मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले. त्यांचा सत्कार  शाल व पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री महोदयांच्या ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी करण्यात आला.




यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तसेच सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले उपस्थित होते. देशमुख यांनी आबा सावंत यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. या घटनेबद्दल सविस्तर माहिती विचारली, आणि त्यांचे कौतुक केले. आबा सावंत हे लातूर जिल्ह्यातील किल्लारीचे रहिवासी आहेत.

आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आबा सावंत यांना १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिल्याचेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Comments are closed

error: Content is protected !!