यापूर्वी  तिनही सामन्यात मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला आहे. यामुळे यंदा रणनीती व खेळ कसा असेल हे पाहणे क्रिकेट रसिकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

IPL( punetoday9news):-  इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सीजनच्या अंतिम सामन्यात आज  दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स समोरासमोर येत आहेत. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या आजच्या अंतिम सामन्यात आयपीएलचा चषक कोणाच्या पारड्यात पडणार हे स्पष्ट होईल. मुंबई आयपीएलच्या आपल्या पाचव्या विजयाचा पताका फडकवण्याच्या तयारीत आहे तर दिल्ली कॅपिटल्स आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.




दिल्लीच्या संघाने पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दिल्लीचा संघ आयपीएलच्या आठ संघांपैकी एकमेव संघ होता जो आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचू शकला नव्हता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या संघाने ही प्रतिक्षा संपवली आहे. आता अनुभवी आणि बलाढ्य असणाऱ्या मुंबईच्या संघासमोर दिल्ली काय चमत्कार करेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

Advt:-

 





या हंगामात दोन्ही संघ तीन वेळा एकमेकांसमोर उभ्या ठाकले होते. या तिनही वेळी मुंबईने दिल्लीला पराभवाचा धक्का दिला होता. लीगमधील दोनही सामन्यात मुंबईने विजय प्राप्त केला होता. प्ले ऑफमध्ये क्वॉलिफायरच्या सामन्यातही दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात काय होणार याकडे सर्व क्रिकेट प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!