पुणे,दि.१०(punetoday9news):- छावा मराठा संघटना पुणे पदवीधरच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरत असून, संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव अपक्ष निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे. संघटनेचे वरिष्ठही या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून असणार आहेत. तशी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रामभाऊ जाधव बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पदवीधर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी जाधव गंभीर असून, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी छावा मराठा संघटने सोबतच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना व पत्रकार उत्कर्ष समितीच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळी येणाऱ्या अडचणी रामभाऊ जाधव सोडवत आले आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थी त्यांच्या पाठीमागे आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी संघटनेने पुणे पदवीधर मतदार संघात उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे.
रामभाऊ जाधव म्हणाले, की संघटनेचे वरिष्ठ नेते निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. तशी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पदवीधर मतदार नोंदणीसाठी आवाहन केले होते. त्याला पदवीधरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. यामुळे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपण स्वतः उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असल्याने मोठा जनसंपर्क आहे. या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. याच जोरावर आपण मताधिक्य खेचू शकतो. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न केले असल्याचे रामभाऊ जाधव यांनी सांगितले.
Advt:-
Comments are closed