मुंबई, दि.१०(punetoday9news):- प्रत्यक्ष कार्यस्थळावर काम करत असताना येणाऱ्या अडचणी तसेच वीज कंपनीच्या हिताच्या दृष्टीने सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनने सादरीकरणात केलेल्या सूचनांचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्वागत केले. भरती प्रक्रिया व फील्डस्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या असोसिएशनच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही डॉ. राऊत यांनी दिली.
Advt:- MBBS Admission
ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता व तीनही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक यांची फोर्ट येथील एमएसईबी सुत्रधारी कंपनीच्या कार्यालयात बैठक घेतली.
प्रत्यक्ष मैदानात काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत, वीज कंपन्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या काय सूचना आहेत, थकीत वीज बिल वसुलीसाठी कोणते उपाय करायला हवेत, याबद्दल प्रत्यक्ष मैदानावर काम करणाऱ्यांना काय वाटते, हे सादर करण्याची संधी मंत्री डॉ.राऊत यांनी सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनला आज दिली.
असोसिएशनने कंपनीच्या हिताच्या दृष्टीने सादर केलेल्या सूचनांचा विचार करून कार्यवाही केली जाईल, असे डॉ. राऊत यांनी सादरीकरणानंतर सांगितले. तसेच कंपनीचा महसूल वाढविण्यासाठी व ग्राहकांकडून थकीत बिल कशाप्रकारे वसुल करता येईल यासाठी केलेल्या सूचना विशेष आवडल्याचे त्यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
Comments are closed