यंदाची दिवाळी आरोग्य धनसंपदा म्हणायला लावणारी आहे कोरोना पासून राहण्यासाठी नियमांचे पालन करूया.
पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
पिंपरी, दि.१२(punetoday9news) :- दिवाळीचा सण हा सर्वांसाठी आनंदाचा मानला जातो पण यंदा कोरोना मुळे सामाजिक , आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक ,शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रावर मोठे संकट कोसळले आहे. कित्येक नागरिकांचे रोजगार गेले आहेत तर कित्येक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे उद्योग धंदे बुडाले आहेत . त्यामुळे आज गरज आहे आपण आपल्या परीने या गरजवंतांना सहकार्य करण्याची . असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केले आहे.
ते म्हणाले कि आज देशावर मोठे संकट असून आपल्या परिसरातील गरजवंत , व्यावसायिकांना मदत करण्यासाठी आपण स्थानिक दुकानदारांकडून , पथारी व्यवसायीकडून खरेदी केल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तुमच्या मदतीचा आधार मिळेल. त्यांची कुटुंबे आनंदाची दिवाळी साजरी करू शकतील . चला एकमेकांना सहकार्य करत सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत सुरक्षित व आरोग्यदायी दिवाळी साजरी करूया.
Comments are closed