राष्ट्रवादीच्या भूमिकेने पुणे पदवीधर मतदार संघात सस्पेन्स कायम .
पुणे , दि.१२ (punetoday9news):- विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मोठी गर्दी पहायला मिळाली . या मतदारसंघात मुख्य लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच असली तरी इतर अनेक उमेदवारांनी या निवडणुकीतही अर्ज दाखल केले आहेत . भाजपने आपला उमेदवार जाहीर केलाय. मात्र, राष्ट्रवादीने अद्याप नाव जाहीर केले नाही.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप माने यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा दावा केला आहे. त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ यांचा मुलगा आणि कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षही उपस्थित होते. तर जनता दलाकडून माजी आमदार शरद पाटील यांनीही त्यांचा निवडणूक अर्ज दाखल केला आहे . मनसेकडून रुपाली पाटील यांनी तर छावा मराठा संघटनेचे राम जाधवही रिंगणात उतरले आहेत . संभाजी ब्रिगेडकडून श्रीमंत कोकाटे यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचेही पारडे इतर उमेदवारांच्या तुलनेत जड असल्याचे बोलले जात आहे.
भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघातून सांगलीच्या संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनही आपला पत्ता झाकून ठेवत रहस्य कायम ठेवले असल्याने सर्वांच्या नजरा तिकडे लागल्या आहेत. संग्राम देशमुख यांनी निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट उपस्थित होते.
Advt :-
Comments are closed