पुणे,दि.१२ (punetoday9news):- ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिनस्त २० शय्या आयुर्वेदीक कक्षात ‘५ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ साजरा करण्यात आला. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात धन्वंतरी पूजनाने झाली. यावेळी आयुर्वेद विभागाचे विभाग प्रमुख वैद्य व्यंकट धर्माधिकारी तसेच श्री लक्ष्मण लावगनकर, श्रीमती अर्पणा सोल, रिया बोन्तापले, डॉ.हरिश, डॉ.सपना यादव आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.मुरलीधर तांबे यांनी कोवीड-१९ विषयी आयुर्वेद योगदानाची माहिती दिली आणि आयुर्वेद संशोधनासंदर्भात आयुर्वेद डॉक्टरांनी पुढे येऊन काम करावे, असे आवाहन केले. आयुर्वेद विभागाचे विभाग प्रमुख वैद्य व्यंकट धर्माधिकारी यांनी आयुर्वेदिक कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच सर्वांनी आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतूचर्या, आहार इत्यादी बाबींचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. आभार अर्पणा सोले यांनी मानले.

 

पुणे- सहायक संचालक (आयुष) यांच्‍या विभागीय कार्यालयात उपसंचालक (माहिती) राजेंद्र सरग यांच्‍या उपस्थितीत व सहायक संचालक डॉ. व्यंकट धर्माधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली राष्‍ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्र.द.सोमवंशी, अंजली कांबळे, अशोक शेगर, जगदीश कुलकर्णी, रणजित ढेरे, पंचाक्षरी पाटील, राजू मोहोळ, सुनील भोसले हे उपस्थित होते. उपसंचालक सरग यांनी ‘कोविड-१९ महामारीसाठी आयुर्वेद’ या संकल्‍पनेवर आधारित विचार व्‍यक्‍त केले. सहायक संचालक डॉ. व्यंकट धर्माधिकारी यांनी आयुर्वेदाचे महत्‍त्‍व विशद केले. आयुर्वेदीक कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी विविध योजना मांडल्या तसेच निरोगी दीर्घायुष्यासाठी सर्वांनी आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतुचर्या, आहार आदी बाबींचा अवलंब करावा, असे सांगितले. प्रारंभी राजेंद्र सरग यांच्‍या हस्‍ते धन्वंतरीचे पूजन करण्‍यात आले. प्र.द.सोमवंशी यांनी आयुष विभागाच्‍या कार्याची माहिती दिली. अशोक शेगर यांनी सूत्रसंचालन तर जगदीश कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.



Advt:- 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!