ही निवडणूक पदवीधरांची आहे कारखान्याची नाही – श्रीमंत कोकाटे.
पुणे,दि. १४ ( punetoday9news):- पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करणारे व्याख्याते, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने अरुण लाड यांना उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर कोकाटे हे त्यांच्या उमेदवारीवर ठाम असून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक लढविणार असल्याने पदवीधर निवडणुकीत भारी रंगत आली आहे .
संपूर्ण राज्यभर मोठा जनसंपर्क असलेल्या कोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीला प्रामुख्याने युवा वर्गाकडून मोठे समर्थन मिळत असल्याचेही दिसून येत आहे त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रचारासाठी वेगवेगळी शक्कल लढवावी लागणार आहे .
निवडणूकीच्या रिंगणात येणे या मागे युवकांच्या हातात पुस्तक, लेखणी आणि रोजगार देणे हा मुख्य उद्देश असल्याचे कोकाटे यांचे म्हणणे आहे.
तसेेच आता माघार घेणार नाही, पदवीधरांचे हिताकरीता निवडणूकीच्या रिंगणार राहणार असल्याचेही कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे. श्रीमंत कोकाटे यांच्या सोबत संभाजी ब्रिगेड सुद्धा पूर्ण ताकतीने मैदानात उतरली आहे, प्रविणदादा गायकवाड यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लागायच्या सूचना केल्या आहेत, प्रवीणदादा गायकवाड यांच्या पाठिंब्यामुळे श्रीमंत कोकाटे पदवीधर निवडणुकीत विजय निश्चित मानला जात आहे.
Comments are closed