संस्थेच्या अध्यक्षा कावेरी संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम.

 

पिंपळे गुरव,दि.१५(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे मुक्तांगण महिला गृहउद्योग संस्थेच्या वतीने पिंपळे गुरव परिसरात साफसफाई करणाऱ्या महिला व पुरुष कामगारांना दिपावलीचा फराळ स्वतः महिलांनी बनवून वाटप करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा कावेरी संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.




त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कावेरी जगताप, निर्मला नवले, मनीषा काटे, कस्तुरी कोलते, कविता दळवी या महिलांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आला.

या प्रसंगी श्रीगणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, आरोग्य निरीक्षक,  माने , सोमनाथ नवले, मुकादम राजू कदम, प्रतिक टांक, आकाश नवले, भारत नवले, दुर्वांकुर कवडे, प्रसाद नवले, अमित कुंभार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Advt:- 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!