सांगवी,दि.१५(punetoday9news):- राष्ट्रवादी काँग्रेस सांगवी-पिंपळे गुरव ब्लॅाकचे अध्यक्ष शिवाजी पाडुळे यांच्या वतीने व कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या हस्ते प्रभाग-३१ मधील स्वच्छता कर्मचारी बंधू व भगिनींना कपडे व वेपोरायझर मशीन अशी अनोखी भाऊबीज दिवाळी भेट देण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवकप्रभारी प्रणव ढमाले सामाजिक न्याय कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, ऊद्योजक सुनील गावडे , शशीकांत ढमाले , प्रताप राणे ,सुरेश ढमाले, प्रमोद करपे ,ओंकार गोडांबे, वार्ड अध्यक्ष मुजाहीद बागवान, गौरव पाडुळे , संकेत गुळवे उपस्थित होते.
प्रशांत शितोळे म्हणाले , कोरोना मुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वच्छतेचे महान कार्य करत आहेत तसेच स्वच्छतेचे हे काम म्हणजे फार मोठी समाजसेवा आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार व सन्मान करणे आपले कर्तव्य आहे.
तर शिवाजी पांडुळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले येणाऱ्या काळात थंडीचा मोसम असल्याने सर्दी, ताप, खोकला अशा आजारांमध्ये वाढ होत असते अशात सफाई कर्मचारी हे स्वच्छतेचे काम करत असताना असे आजार आजाराने त्रस्त होऊ नये म्हणून यांच्या आरोग्याची काळजी घेत आपण दिवाळी भाऊबीज म्हणुन वाफेचे मशीन भेट देत आहोत.
Advt:-
Comments are closed