बीड,दि.१५(punetoday9news):-  दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणाऱ्या तरुणीवर लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना येळंबघाट (ता. बीड) येथे घडली. उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला.





शेळगाव ( ता.देगलूर जि. नांदेड ) येथील तरुणी गावातीलच एका तरुणासोबत (आरोपी) गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दि.१३ नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास येळंबघाट (ता.बीड ) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा – केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली.





तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर तरुणाने अ‍ॅसिड टाकले. त्यांनतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.  पहाटे ३ वाजता ही घटना घडली. अर्धवट भाजलेल्या अवस्थेत २२ वर्षीय तरुणी रस्त्यालगत तब्बल १२ तास पडून होती. अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने ४८ टक्के टक्के शरीर भाजले होते.
दुपारी २ वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्यात पाहिल्यानंतर समजले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.  पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून अविनाश राजुरे या तरुणाविरुद्ध नेकनूर ( ता.बीड ) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Advt:-

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!