पुणे, दि.१५(punetoday9news):- खेड शिवापूरजवळच्या वेळू फाट्याजवळची काळ्या मसाल्यातील साईछाया मिसळ पुन्हा एकदा हिराबाग इथे सुरू होत आहे. आधी हिराबाग इथेच आणि नंतर काही काळ म्हात्रे पुलाजवळ ‘साईछाया’ सुरू होती. जागेच्या विषयाचा तिढा सुटल्यामुळे आता पुन्हा एकदा मंगेश काळे यांनी हिराबाग येथील आधीच्याच जागेत मिसळ जॉइंट सुरू केला आहे.
नाशिकप्रमाणेच काळ्या मसाल्यातील मिसळ आणि सोबतीला पापड हे कॉम्बिनेशन देणारी पुण्यातील पहिली आणि कदाचित एकमेव मिसळ. हल्ली अनेक मिसळ जॉइंट्सवर सुरुवातीला कमी रस्सा देऊन नंतर रश्शासाठी दाबून पैसे घेण्याचे प्रकार होत असल्याचं दिसून येतं. पण साईछायात असे प्रकार होताना कधीच आढळणार नाही.
पुण्यात हल्ली मिसळचे रोज चार जॉइंट सुरू होतात आणि लोकांना आवडत नाही, म्हणून पाच जॉइंट्स बंद पडतात. पण साईछाया मिसळ पुणेकरांच्या पसंतीस उतरली. लोकप्रिय झाली. इतकंघ काय तर मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिकांमधील कलावंतही ‘साईछाया’च्या प्रेमात पडले.
अशी ही साईछाया मिसळ पुन्हा एकदा त्याच ठिकाणी सुरू होतेय, ही आनंदाची गोष्ट आहे. गप्पांची मैफल जमवायला आणखी एक मस्त आणि हक्काची जागा मिळाली.
ADVT:-
Comments are closed