(Punetoday9news):- ग्रीन टी आणि ब्लॅक टी- ग्रीन आणि ब्लॅक टी दोन्ही आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला बळकट करण्यासाठी एक किंवा दोनच कप पिणे फायदेशीर असते. याच्या अधिक सेवनाने आपली भूक कमी होऊ शकते.
लसूण- जर आपणास सांधे दुखण्याचा त्रास आहे, तर आपल्या आहारात कच्चा लसूण समाविष्ट केल्याने आपली प्रतिकारक शक्ती वाढते. यामध्ये अॅलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ए आणि इ मुबलक प्रमाणात आढळतात.
दही- आपल्याला जळजळ होत असल्यास तर आपण दह्याचे सेवन करू शकता. दह्याच्या सेवनाने प्रतिकारक क्षमता वाढते. तसेच हे पाचक प्रणालीला चांगले ठेवण्यास उपयुक्त आहे.
ओट्स- हे खाल्ल्याने आपले वजनच कमी होणार नाही तर या मध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. दररोज ओट्सचे सेवन केल्याने आपली प्रतिकारक शक्ती बळकट होते.
व्हिटॅमिन सी- लिंबू आणि आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं, तसेच पालक, संत्री, मोसंबी, चवळी, कोबी, कोथिंबीरमध्येही व्हिटॅमिन सी आढळतं. जे रोग प्रतिकारक क्षमतेला चांगले ठेवण्यासाठी मदत करतात.
अंजीर- अंजीर पोटॅशियम, मॅगनीज आणि अँटी ऑक्सीडेन्ट घटकाने समृद्ध असतात. हे शरीराच्या पीएच पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
जवस- अळशी मध्ये ओमेगा-३ आणि फॅटी अॅसिड आढळते. शाकाहारी असणाऱ्यांना ओमेगा -३ आणि फॅटी अॅसिड हे चांगले स्रोत आहे.
मशरूम- मशरूम खाल्ल्याने आपली रोग प्रतिकारक शक्तीच बळकट होत नाही तर हे पांढऱ्या रक्त पेशींचे कार्य वाढवून शरीराच्या प्रतिकारक शक्तीला वाढवते. कर्क रोगापासून संरक्षणासाठी देखील मशरूमचा वापर केला जातो.
गाजर- गाजराचे काम शरीरात रक्त वाढविण्यासाठी, गाजराच्या सेवनाने फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. डोळ्याच्या आजारांना टाळण्यासाठी नियमितपणे गाजराचे सेवन करावे.
टॉमेटो- टॉमेटोमध्ये लायकोपिन असतं, जे शरीरातील मुक्त असलेल्या रॅडिकल्स ला न्यूट्रलाइझ करतं, यामुळे फ्री किंवा मुक्त असलेले रॅडिकल्स आपल्या शरीरास काही हानी पोहोचवू शकत नाही. रक्तवाढीसही उपयोगी आहे.
ADVT:-
Comments are closed