( punetoday9news):-  एकीकडे संपूर्ण जग हे कोरोनावर मात करणाऱ्या लसीकडे संपूर्ण लक्ष लागलेले असताना जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रियेसिस यांनी कोरोना लसीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे . त्यांनी ट्विट करत म्हटले आहे कि एखादी लस कोरोनाचा संसंर्ग रोखू शकत नाही.  एकीकडे युरोपिय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे तर दुसरीकडे कोरोनामुळे आतापर्यंत लाखो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशातच कोरोना लसीसंदर्भात डब्ल्यूएचओने केलेल्या या मोठ्या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.





डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रियेसिस बोलताना म्हणाले की, कोरोनाची लस आल्यानंतर ते या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवू शकणार नाही. टेड्रोस यांनी सोमवारी बोलताना सांगितले की, लस आल्यानंतर ती करोनाशी लढण्यासाठी आपण वापरत असलेल्या इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणूनच काम करेल. परंतु, ही लस त्यांची जागा घेऊ शकणार नाही.





 

Comments are closed

error: Content is protected !!