मुंबई, दि.१८(punetoday9news):- पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचे आयोजन केले होते. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी कारवाई करत राम कदम आणि त्यांच्या काही समर्थकांना अटक करून सुटका करण्यात आली आहे.
राम कदम यांनी बुधवारी सकाळी ८.३० वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले होते.
पालघर हत्याकांडाला २११ दिवस होऊनही अद्याप कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती. राम कदम यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणीदेखील केली आहे.
यावर “पोलिसांची ही कारवाई दुर्दैवी असून सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे’, अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली.
१६ एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या २ साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी १५४ जणांना अटक केली असून ११ अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे . तसेच ५ पोलिसांना निलंबित करण्यात आले असून ३० हून अधिक बदल्या करण्यात आल्या आहेत. पालघरमधील घटनेनंतर राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.
ADVT:-
Comments are closed