पुणे,दि.१९(punetoday9news):- पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते पण आता कुणी आमदार बनवणारे शहर म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याला कारणही तसेच आहे. पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात अनुक्रमे चार लाख २६ हजार २५७ आणि ७२ हजार ५४५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दोन्ही मतदार संघांमध्ये सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात असल्याने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांचा निकाल पुणेकरांच्या हाती असणार आहे.
पदवीधर मतदार संघात मतदारांची संख्या चार लाख २६ हजार २५७ झाली आहे. या मतदार संघात सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यातयात एक लाख ३६ हजार ६११ झाले आहेत. तर, शिक्षक मतदार संघातही सर्वाधिक ३२ हजार २०१ मतदार पुणे जिल्ह्यात झाले आहेत. दोन्ही मतदार संघांमध्ये सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात असल्याने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांचा निकाल पुणेकरांच्या हाती असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
पदवीधर मतदार संघ मतदार.
पुणे – एक लाख ३६ हजार ६११, कोल्हापूर – ८९ हजार ५२९, सांगली – ८७ हजार २३३, सातारा – ५९ हजार ७१ आणि सोलापूर – ५३ हजार ८१३ एकू ण मतदार चार लाख २६ हजार २५७
शिक्षक मतदार संघ मतदार
पुणे – ३२ हजार २०१, सोलापूर – १३ हजार ५८४, कोल्हापूर – १२ हजार २३७, सातारा – सात हजार ७११ आणि सांगली सहा हजार ८१२ एकूण मतदार ७२ हजार ५४५.
Advt:-
Comments are closed