पुणे, दि. १९(punetoday9news):- आश्चर्य वाटलं ना जागतिक पुरुष दिन ऐकून! हो 19 नोव्हेंबर हा दिवस दर वर्षी जागतिक पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा मानला जातो.
पुरुषांसोबत होणारा भेदभाव, शोषण, हिंसा रोखण्यासाठी, त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणं आणि त्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
सर्वात प्रथम 7 फेब्रुवारी 1992 ला अमेरिका, कॅनडा आणि युरोपच्या काही देशांमध्ये जागतिक पुरुष दिन साजरा करण्याची सुरुवात झाली. मात्र 1995 पासून हा दिवस साजरा होणे बंद होत गेले. पुढे 1998 साली त्रिनिदाद आणि टोबॅगो मध्ये पुन्हा एकदा 19 नोव्हेंबर डॉ. जीरोम तिलकसिंह यांनी हा दिवस सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. पुढे हळू हळू 70 देशांमध्ये हा दिवस पुरुष दिवस म्हणून मानला जाऊ लागला आणि युनेस्कोने पण या दिवसाला मान्यता दिली.
भारतात सेव्ह इंडियन फॅमिली या फाउंडेशनने 2007 साली सर्वात आधी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. पुढे ऑल इंडिया मेन्स वेल्फेअर फाउंडेशनने महिला विकास मंत्रालयासारखं पुरुष विकास मंत्रालय सुरु व्हावं हि सुद्धा मागणी केली आणि जागतिक पुरुष दिन सर्वांना माहित व्हावा यासाठी प्रयत्न सुरु ठेवले.
पुरुषांनो नैराश्यात न राहण्यासाठी करा असे काही.
▪️ कुटुंबाला वेळ द्या, सुटीच्या दिवशी फिरायला जा.
▪️ नकारात्मक विचारांपासून दूर राहा.
▪️ आपली अडचण, समस्या बोलून दाखवा.
▪️ मित्र, नातेवाइकांसोबत गप्पा मारा.
▪️ शक्य असल्यास जबाबदारीचे योग्य नियोजन करा.
Advt:-
Comments are closed