पुणे, दि. १९(punetoday9news):- पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असून, महा ठोका संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणारे शिक्षक सर्जेराव जाधव हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, निवडणुकीत प्रथम क्रमांकाची सर्वाधिक मते मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महा ठोका ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणारी शिक्षक संघटना आहे. सर्जेराव जाधव हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांचे मार्गे लावले आहेत. पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे अनेकदा आंदोलने, उपोषणे करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. सर्जेराव जाधव यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातील अनेक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.
कुणाच्या दबावाला बळी न पडता, कुठल्याही राजकीय पक्षाचे लेबल न लावता केलेल्या कामावर भर देत आपण निवडणुकीला सामोरे जात असल्याचे जाधव यांनी सांगितले. शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यात आपण वीस वर्षे खर्च केले आहेत, त्यामुळे सामान्य शिक्षक आपल्यालाच मतदान करतील, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.
Advt:-
Comments are closed