खडकी, दि.२०(punetoday9news):- इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची जूनमध्ये होणारी पुर्नपरीक्षा कोरोना प्रादुर्भावाने यंदा नोव्हेंबरमध्ये सुरू झाली असून खडकी येथील ऑल सेंट्स हायस्कूल मध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत परीक्षेस सुरूवात करण्यात आली.
अतिशय शिस्तबद्धपणे नियमांचे पालन यावेळी करण्यात आले. शाळेच्या गेटवरच विद्यार्थ्यांना सॅनिटाईज करून प्रवेश देण्यात आला. त्यानंतर वर्गात देखील प्रत्येक शिक्षकांनी हातामध्ये ग्लोज व तोंडावर मास्क परिधान केला होता व प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःजवळ सॅनिटायझर व तोंडावर मार्क्स घालणे अनिवार्य करण्यात आले होते.
शिस्तबद्धपणे नियोजन केल्याबददल शाळेच्या मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग व केंद्र संचालक जसूराज अंग दुराई व उपकेंद्र संचालक ग्रेस साळवी यांचे शाळेचे डायरेक्टर जयसिंग डी यांनी कौतुक केले.
अशी माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक सुनिल साठे यांनी दिली.
Comments are closed