पुणे,दि. 22( punetoday9news):- पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी 3 डिसेंबरला होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने ‘कोविडपासून सुरक्षित निवडणूक’ हे ध्येय्य साध्य करण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.
1)आधार कार्ड 2) ड्रायव्हींग लायसन्स 3)आयकर ओळखपत्र (पॅनकार्ड ) 4)पासपोर्ट (पारपत्र) 5)केंद्र / राज्य शासकीय / निमशासकीय कर्मचारी / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था किंवा औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवाचे ओळखपत्र 6)खासदार/विधान सभा सदस्य/विधान परिषद सदस्य यांना दिलेले शासकीय ओळखपत्र 7)संबंधित पदवीधर / शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर / शिक्षक मतदारांना वितरीत केलेले ओळखपत्र 8)विश्वविद्यालयाद्वारे वितरीत पदवी / पदविका मूळ प्रमाणपत्र 9)सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र.
ज्या मतदारांना भारत निवडणूक आयोगाचे फोटो ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहे, त्यांनी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करणे आवश्यक आहे. तथापि, असे ओळखपत्र सादर न करु शकणाऱ्या मतदारांनी वरीलपैकी एक पर्यायी फोटो ओळखपत्र त्यांची ओळख देण्यासाठी सादर करणे आवश्यक आहे.
Advt:-
Comments are closed