पुणे,दि.22(punetoday9news):-  मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुकडील सर्व्हिस रुंदी वाढवून 12 मीटर सर्व्हिस रस्ता रुंदीकरण करण्यासाठी टेकडीचे खोदकाम चालु आहे. या ठिकाणी जुना पुल काढण्यात येवून त्या ठिकाणी दुसरा नवीन पुल बांधण्यात येणार आहे. त्याकरीता पुलापासून 350 मीटरचा रस्ता पुलावर जाण्यासाठी सुसगावच्या बाजूकडून तयार करणार आहे.




या कामामुळेच मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील जुना पाषाण – सूस उड्डानपुल हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. पर्यायी मार्गानुसार पाषाण ते सुसगाव व सुसगाव ते पाषाण कडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हुंदाई शोरुम सुसरोड येथुन सुपीरो ईलाईट सोसायटी मार्गे ननावरे सबवे मधुन इच्छित स्थळी जाण्याचे आवाहन पिपंरी चिंचवड वाहतुक शाखेचे पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.



Advt:-


Comments are closed

error: Content is protected !!