सांगवी, दि. २२(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी व पिंपळे गुरव परिसरात विषारी सापांची संख्या वाढली असून   बारा तासांत आठ घोणस जातीचे विषारी साप मानवी वस्तीतून रेस्कीव करून निसर्गात मुक्त केले असल्याची माहिती वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनायक बडदे यांनी दिली आहे. 




थंडीच्या दिवसात मानवी वस्ती जवळ मोठ्या  प्रमाणात हे साप आढळून येतात. घोणस जातीचा साप जहाल विषारी असुन हा अजगरा प्रमाणे जाड व सुस्त दिसतो. धोका जाणवल्यास कुकरच्या शिट्टी प्रमाणे आवाज काढून समोर आलेल्या प्राण्याला सावध करतो.

साप हा थंड रक्ताचा प्राणी असल्यामुळे सापांना गरम वातावरण हवे असते. त्यामुळे सापांना जास्त थंडी सहन होत नसल्याने हे मानवी वस्ती जवळ पार्किंग मध्ये, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या जवळ व अडगळीत ठेवलेल्या लाकडी सामानात उष्णता घेण्यासाठी येऊन बसतात.




त्यामुळे  नदी, नाले, पडीक जमिन व शेती जवळ राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे. अडगळीत हात घालण्यापूर्वी किंवा सकाळी वाहन चालू करण्यापूर्वी  व्यवस्थित तपासणी करून घ्यावी.

असे आवाहन वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Advt:-

Admission MBBS

 

Comments are closed

error: Content is protected !!