वडगाव, दि. २२( punetoday9news):- खेड तालुक्यातील वडगाव येथे अनोख्या पद्धतीने संवाद फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वडगावचे ग्रामपंचायत सदस्य निलेश ढवळे यांनी वाढदिवस साजरा केला.
केक कापुन वाढदिवस साजरा करण्यापेक्षा निराधार , अनाथ आणि अपंगाना अनेक शासकीय योजनाचा लाभ मिळवुन देण्यासाठी तसेेच शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते.
यावेळी शिवव्याख्याते संपत गारगोटे, जिजाऊ प्रतिष्ठान महाराष्ट्रचे संघटक रज्जाक शेख आणि खेड तालुका राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान चे अध्यक्ष अनिल बारणे, ग्रामस्थ , अनेक लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Advt:-
Admission MBBS
Comments are closed