दिल्ली, दि.२३( punetoday9news):- जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बीएसएफच्या जवानांना एक भुयार सापडली आहे. या भुयारला बीएसएफ आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी गस्त घालत असताना शोधून काढले आहे.   





बीएसएफचे आयजी एनएस जामवाल यांनी माहिती दिली की, अशी शक्यता आहे की नगरोटा एनकाऊंटरमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांनी याच भूमिगत भुयारातून भारतीय सीमेत घुसखोरी केली होती.

जामवाल म्हणाले की, “असे वाटते की नगरोटा एनकाऊंटरमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांनी सांबा सेक्टर आंतरराष्ट्रीय सीमेजवळूनच 30 ते 40 मीटरच्या भुयारमधून भारतीय सीमेत घुसखोरी केली. कोणत्यातरी गाईडने मदत केली असावी, ज्याने त्यांना येथून हायवेपर्यंत घेऊन गेले. हा नवा भुयार आहे.




शुक्रवारपासून सीमा भागात एँटी टनलिंग अभियान सुरु करण्यात आले आहे. याअंतर्गत बीएसएफसोबत आर्मी आणि पोलिसही या कामात गुंतले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने आम्हाला हे आरोप अमान्य असून भारताने यापुढे चुकीचा निष्कर्ष काढणे बंद करावे, असे आवाहनही पाकिस्तानने केले असल्याची माहिती आहे.

Advt:-

Admission MBBS


Comments are closed

error: Content is protected !!