(Punetoday9news):- 1 डिसेंबर 2020 पासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक बदल होणार आहे.




रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट संबंधी नियम बदलले आहेत. हे नियम कॅश ट्रान्सफर संबंधित आहेत. त्याशिवाय सरकारी तेल कंपन्या दर महिन्याला गॅसचे दर अद्यतनित करतात.

RTGS सुविधा –

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट 24x7x365 उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. हा निर्णय डिसेंबर 2020 पासून लागू होईल. आता आपण RTGS मार्फत चौवीस तास पैसे ट्रान्सफर करू शकतात.




प्रीमियममध्ये बदल –

आता 5 वर्षानंतर विमाधारक प्रीमियमची रक्कम 50 टक्क्यांनी कमी करू शकेल. म्हणजेच, अर्धा हप्ता देऊनही तुम्ही पॉलिसी चालू ठेवू शकता.

नवीन ट्रेन-

भारतीय रेल्वे 1 डिसेंबरपासून अनेक नवीन गाड्या चालवणार आहे. कोरोनात अनेक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या होत्या. 01077/78 पुणे-जम्मूतवी पुणे झेलम स्पेशल आणि 02137/38 मुंबई फिरोजपूर पंजाब मेल स्पेशल दररोज धावतील.

एलपीजीच्या किंमती बदलतील

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकार एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेते. म्हणजेच 1 डिसेंबर रोजी देशभरात स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती बदलतील. गेल्या महिन्यांत या किंमतींमध्ये कोणताही बदल झाले नव्हते.

Advt:-

Admission MBBS

 

 

Comments are closed

error: Content is protected !!