(Punetoday9news):- व्हॉट्सअ‍ॅपने डिसॲपियरिंग मेसेजेस फिचर वापरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. डिसॲपियरिंग मेसेजेस हे ऐच्छिक फिचर असणार आहे. हे फिचर ऑन केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरील मेसेज 7 दिवसांनंतर आपोआप डिलीट होतील.

डिसॲपियरिंग मेसेजेस फिचर अशा प्रकारे सुरु करा.

प्रथम गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन तुमचे व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जन अपडेट नसेल केले तर करून घ्या.




व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट विंडो ओपन करा

त्यानंतर कॉन्टॅक्ट नेमवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला डिसॲपियरिंग मेसेजेस फिचर ऑन करण्याचा पर्याय दिसेल.

तुम्ही ‘डिसॲपियरिंग मेसेजेस’ पर्यायावर क्लिक करताच ON आणि OFF चा पर्याय दिसेल. येथून ते फिचर ON करा.

आता हे फिचर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अ‍ॅक्टिव्हेट होईल आणि पाठविलेले संदेश, फोटो आणि व्हिडिओ 7 दिवसांनंतर आपोआप अदृश्य होतील.

तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी किंवा ग्रुपसाठी हे फिचर तुम्ही ऑन केल्यावर त्यासंदर्भातील नोटीफिकेशन समोरच्या व्यक्तीला जाईल. डिसॲपियरिंग मेसेजेस तुम्ही फॉरवर्ड केल्यानंतर तो पुढील फक्त 7 दिवस दिसत राहील.

Advt:-

 

Comments are closed

error: Content is protected !!