मुंबई, दि.२३(punetoday9news):- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाचे पथक पोहोचले. याशिवाय त्यांचे पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचे म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.





अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून प्रतिक्रिया देऊ, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले आहे.

दिल्लीच्या टीमच्या नेतृत्त्वात ही कारवाई सुरु आहे.  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. यामुळे भाजपला सत्तेबाहेर राहावे लागले.  याचा बदला म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ईडीच्या माध्यमातून शिवसेना नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा रंगली आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!