मुंबई, दि. २५(punetoday9news):- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही आठवड्यात कमी झाली असून पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याबाबत राज्य शासनाचा अद्याप कुठलाही विचार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे .
महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. रुग्णवाढीचा राष्ट्रीय दर ०.४ टक्के इतका असताना आपल्याकडे तो ०.२ टक्के इतका आहे.
आपण दिवाळीच्या दिवसांत दररोज २५ हजार चाचण्या करत होतो, ते प्रमाण आता ९० हजार चाचण्यांवर आले आहे.
कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण काहीसे वाढले आहे. पंतप्रधानांनीही चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.
परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या ८-१० दिवसांत लॉकडाऊनबाबतचा निर्णय शासन घेईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी म्हटले होते. मात्र, कडक लॉकडाऊनची स्थिती सध्यातरी नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Comments are closed