दिल्ली, दि. २५( punetoday9news):- २७ नोव्हेंबरला इंटरनेट फ्रीडम फाउंडेशन (IFF) चेहरा ओळखण्यासाठी हा भारतामधील पहिला फेस टेक ट्रॅकर लाँच करणार आहे. त्यांनी सोमवारी जाहीर केले की, ते ‘प्रोजेक्ट पॅनोप्टिक’ हे तंत्रज्ञान लाँच करण्याच्या पूर्णपणे तयारीत आहेत.
कंपनीने सांगितले की,भारतात हा ट्रॅकर २७ नोव्हेंबर रोजी लाईव्ह होईल. इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनने सरकारकडे डेटा संरक्षण कायद्यासह चेहऱ्याची ओळख तंत्रज्ञानाबाबत विशिष्ट कायदे करण्याची मागणी केली आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने (NCRB) अंदाजे ३०८ कोटी रुपये बजेट असलेले, फोटोंचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी, ऑटोमेटेड फेशिअल रेकग्निशन सिस्टम (AFRS) स्थापित करण्याची योजना सुरू केली आहे.
याचा उद्देश पासपोर्ट डेटाबेस, गुन्हे व गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम्स, इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम, खोयापाया पोर्टल, ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टम आणि पोलिस किंवा अन्य विभागाच्या कोणत्याही इमेज डेटाबेसमधून डेटा गोळा करून गुन्हेगारांची ओळख पटवणे हा आहे.
इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनचे म्हणणे आहे की, ‘सरकारी यंत्रणांमध्ये डेटा शेअर करण्यासह डेटा संकलन, संचयन आणि डेटा वापरासाठी जबाबदार एएफआरएस ठेवण्यासाठी एक मजबूत डेटा संरक्षण कायदा आणला जावा. यात थर्ड पार्टीसह डेटा शेअर करणे देखील समाविष्ट असावे.’
Comments are closed