लंडन,दि.(punetoday9news):- मासिक पाळीशी संबंधित सर्व साधने मोफत उपलब्ध करून देणारा स्कॉटलंड हा जगातला पहिला देश ठरला आहे.
स्कॉटलंडच्या संसदेत मंगळवारी एकमताने पीरिएड प्रॉडक्ट्स बिल मंजूर करण्यात आले.
ज्या कोणाला आवश्यकता आहे, त्यांना टॅम्पॉन्स तसंच सॅनिटरी पॅडसारखी साधने मोफत उपलब्ध करून देणे हे आता स्थानिक प्रशासनावर कायदेशीररित्या बंधनकारक असेल. स्कॉटलंडमधल्या ३२ कौन्सिलवर ही जबाबदारी आहे.
मजूर पक्षाच्या खासदार मोनिका लेनन यांनी हे विधेयक मांडले. ‘पीरिएड पॉव्हर्टी’ म्हणजेच ‘पाळीसंदर्भातील दारिद्र्य’ दूर करण्यासाठी मोनिका लेनन २०१६ पासून प्रयत्न करत आहेत.
महिलांचे आरोग्य ध्यानात घेऊन स्कॉटलंड सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. सर्व वयोगटातील महिलांना मासिक पाळीशी संबंधित टॅम्पोन्स आणि सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करुन देणारा स्कॉटलंड हा जगातील पहिला देश बनला आहे. मासिक पाळीशी संबंधित जगभर चालणाऱ्या जागरुकता चळवळीचा हा विजय असल्याचे मानले जात आहे .
मंगळवारी स्कॉटिश पार्लमेंटने यासंदर्भातील पिरियड प्रोडक्ट बिल बिनविरोध मंजुर केले आहे. यामुळे आता शाळा, विद्यापीठे आणि इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी मासिक पाळीसंबंधित उत्पादने मोफत उपलब्ध करण्यात येतील. अशा प्रकारची उत्पादने मोफत उपलब्ध होतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी ही स्थानिक सरकारी संस्था आणि शिक्षण संस्थांवर असणार आहे.
Comments are closed