अयोध्या,दि.२५(punetoday9news):- अयोध्यामध्ये राममंदिराच्या उभारणीचे काम सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारच्या कॅबिनेटमध्ये अयोध्यामधील एअरपोर्टचे नाव ‘मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम एअरपोर्ट’ या नावाने केलं जाण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
या विमानतळाला आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा दिला जाईल. इन्फ्रास्ट्रक्चरदेखील आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या दर्जाचे असावे, याची काळजी घेतली जात आहे.
येत्या 3 ते 4 वर्षांत देश-विदेशातील रामभक्त तसेच पर्यटक मंदिराच्या दर्शनासाठी येथे यायला लागतील, हे लक्षात ठेवून या एअरपोर्टची उभारणी करण्यात येणार आहे.
अयोध्येत 600 एकर जागेवर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम एअरपोर्टच्या निर्मितीचे काम सुरु आहे.
पहिल्या टप्प्यात ए-321 विमानांसाठी 463.10 एकर जमीनीची आवश्यकता असणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील बोईंग 777 प्रकारच्या विमानांसाठी 122.87 एकर जमीनीची आवश्यकता असेल.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्या यांनी ट्विट करुन म्हटलंय की, अयोध्येतील विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वरुपात विकसित केलं जाणार आहे. योगी सरकारने या एअरपोर्टच्या उभारणीसाठी 525 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
Advt:-
Comments are closed